Skip to content Skip to footer

स्वखर्चाने शिवसेना आमदाराने कोविड सेंटर उभारले!

स्वखर्चाने शिवसेना आमदाराने कोविड सेंटर उभारले !

कोरेगावच्या शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने काडसिद्वेश्वर महाराज कोविड सेंटर उभारले असून, तिथे जिल्ह्याभरातुन रुग्ण उपचारासाठी येत आहेत व बरे होऊन जात आहेत. अत्याधुनिक पद्धतीने उभारलेले हे कोविड सेंटर एका बड्या प्रशस्त हॉस्पिटलच्या इमारतीप्रमाणे वाटत आहे. आमदार महेश शिंदे स्वतः २४ तास उपलब्ध राहून कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचाराची माहिती घेत आहेत.

 

कोरोनावर तातडीने उपचार मिळावे म्हणून सर्व आमदारांनी मतदार संघात प्रयत्न सुरु केले आहे. मात्र आमदार शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. आमदार महेश शिंदे यांनी स्वतःच्या खर्चाने कोरेगाव येथे काडसिद्धेवर महाराज कोविड सेंटर उभारले आहे.

 

मध्यंतरी कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते ही बाब आमदार शिंदे यांनी सतत सतावत होती. तसेच अनेकांना आपला उपचाराअभावी जीव गमवावा लागला होता. त्यामुळे स्व:खर्चाने आमदार महेश शिंदे यांनी कोविड सेंटर उभारले होते.

Leave a comment

0.0/5