आयुक्त चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात शीतयुद्द सुरु
शिवसेनेची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेत शिवसेना महापौर किशोरीताई पेडणेकर आणि मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यात सतत वाद होताना दिसून येत आहे. आयुक्त इकबाल सिहं चहल हे उद्धटपणे उत्तरे देत असल्याचा आरोप शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी लावले होते. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेते आणि नगरसेवकांचा तरी मान राखावा नाही तर राज्य शासनात परत जावे, अशी भूमिका महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी घेतली आहे.
आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेना पक्षाचे सर्वच्या सर्व नगरसेवक सकाळीच सभागृहात हजर झाले होते. मात्र अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांसह शिवसेना नगरसेवकांनी तिथेच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली.
यावर बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही वेळेत निवडणुकीसाठी पोहचले होतो, मात्र अधिकारी गैरहजर होते. आयुक्तांना अनेक फोन केले. त्यानंतर त्यांनी फोन उचलायची तसदी घेतली होती. त्यावेळी ते अतिशय उद्धटपणे बोलले तुम्ही पॅनिक का होताय? तुम्हाला थोडा वेळ थांबता येत नाही का? अशा भाषेत ते बोलले. किमान त्यांनी खुर्चीचा मान तरी राखायला पाहिजे. ते स्वतःला काय समजतात? त्यांना काम जमत नसेल तर त्यांनी राज्य सरकारकडे परत जावं, अशा शब्दात महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.