Skip to content Skip to footer

राज्यपालांना बडतर्फ करा ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी.

राज्यपालांना बडतर्फ करा ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातील “लेटर वॉर” राज्यभरात चांगलेच गाजले होते. त्यात आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यपाल कोश्यारी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानाचा औचित्यभंग केला आहे. त्यांच्याकडून राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप सुरु आहे. त्यांच्याकडून संविधानाचा आणखी उपमर्द घडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी माकपने केली आहे.

 

माकपने पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे. असा घातक सल्ला देत असतानाच राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे, असे माकपने सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5