Skip to content Skip to footer

युवासेना तर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेवर लघुपट स्पर्धा!

 

कोरोनाच्या संसर्गाला राज्यात आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी ठरताना दिसत आहे. हाच विषय घेऊन युवासेनेनं लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.

युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनाशुल्क असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना ३ मिनिटांचा लघुपट बनवावा लागेल. लघुपट बनवताना मोबाइल फोन किंवा कॅमेराद्वारे चित्रीकरण करता येईल. व्हिडिओचा आवाज उत्तम दर्जाचा असावा, असे अयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या लघुपट स्पर्धेत प्रवेश स्वीकारण्याची तारीख २५ ऑक्टोबर २०२० रात्री १० वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला रोख ५० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३० हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला २० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे प्राथमिक परीक्षक अभिनेता मिलिंद गवळी, दिग्दर्शक प्रमोद प्रभुळकर, रवींद्र करमरकर, अभिनेता प्रदीप वेंगुर्लेकर तर अंतिम परीक्षक दिग्दर्शक-अभिनेता सुबोध भावे, दिग्दर्शक महेश लिमये, लेखक-दिग्दर्शक अजित भुरे हे असतील. स्पर्धेचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोजक अमोल परब यांच्याशी ९८७०५४९८६३, ८९८८९८७१७२ या क्रमांकावर स्मारक साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5