सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी काही ठराविक मद्यमांकडून आणि पक्षांकडून बॉलीवूड मधील कलाकारांवर आरोप करणे सुरू आहे. ड्रग्जप्रकरणात अनेक कलाकारांची नावे घेतली जात आहेत. याबाबत नापसंती व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला की, बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, उत्तरप्रदेशात राज्य सरकारने चित्रपट नगरी उभारण्याचे काम सुरू केले आहे. कोविडच्या संसर्गामुळे राज्यातील चित्रपटगृह, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज इथे हॉलिवूड सिनेमांच्या तोडीस तोड सिनेमे बनत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठरावीक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करणे सुरू आहे, हे अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहात आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत.