आता भाजपचा हा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट झाली.
या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यापूर्वी सुद्धा अजित पवार यांची आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याचे बघावयास मिळाले होते.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मौन सोडत उत्तर दिलं आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मला काहीही माहित नाही. एकनाथ खडसे यांच्या विषयी जेवढी माहिती मला होती. ती सर्व