Skip to content Skip to footer

सध्या ‘मास्क’ वापरणे हीच आपल्यासाठी उत्तम लस – मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे तर, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आता महाराष्ट्राचा कोरोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

सध्या कोरोनाची लस अद्याप येू शकलेली़ नाही त्यामुळे ‘करोनाची लस प्राप्त होईपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे हे लक्षात ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वानी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठी अफेरेसिस युनिटचे व्हिडीओ कॉन्फरंसच्या सहाय्याने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. तसेच, रत्नागिरीबद्दल बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी अशी व्यवस्था झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5