Skip to content Skip to footer

मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासासंदर्भात पर्यटन,पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.

मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता बघून माहिती सादर करावी, अशा सूचना मानती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी माहिती घेतली.

शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ‘एमएमआरडीए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती यावेळी घेण्यात आली होती. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a comment

0.0/5