Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत आमच्यात पक्षीय राजकारण येत नाही – पंकजा मुंडे

एकीकडे कोरोनाचे संकट गडद असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीसह नेते आणि विरोधी पक्षातील अनेक बडे नेते शेतकऱ्यांच्या बंदावर पोहचून नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करत त्यांना धीर देण्याचे काम करत आहे. याच दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे हे देखील पाहणी करण्यासाठी नांदेड येथे पोहचल्या होत्या त्यानंतर उपस्थित पत्रकार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मी करणार आहे असे पंकजा मुंडे यांनी बोलून दाखविले.

यंदाचा दसरा तर शेतकऱ्यांना साजरा करता आला नाही, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी प्रकाशमय आणि गोड करावी, अशी मागणी यावेळी पंकजा मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मात्र भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

Leave a comment

0.0/5