मराठवाड्यात औरंगाबाद व आसपास मुसळधार पावसाची हजेरी
वेध शाळेच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी परतीचा पाऊस होत असून, त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात लोकांची चांगलीच तारांबळ झाली आहे. मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणावर या पावसाचे प्रमाण दिसून येत असून, औरंगाबाद मध्ये शहर तसेच आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील येथे वाहत आहे. त्यातच या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गेली असून, अनेक ठिकाणी पाणी साचाण्याचे प्रमाण वाढल्याचे कळत आहे.
या मुसळधार पावसाचा वेध शाळेने अंदाज दिल्या नंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिले होते.