Skip to content Skip to footer

खडसेंचा प्रवेश रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न!

खडसेंचा प्रवेश रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न!

 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे तसेच आपली सून रक्षा खडसे यांच्यासह येत्या गुरुवारी राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

 

एकनाथ खडसेंच्या मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे यांच्या समर्थकांनी भाजपाचे चिन्ह सुद्धा एकनाथ खडसेंच्या बॅनरवरून काढून टाकण्यास सुरवात केली आहे.

 

मात्र दुसरीकडे भाजपाकडून खडसेंना रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी चर्चा केली. याला खडसे यांनीही दुजोरा दिला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हा फोन खडसे यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठीच असावा, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Leave a comment

0.0/5