Skip to content Skip to footer

हिम्मत आले तर सरकार पडून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आवाहन

“विरोधी पक्षातील अनेक जण हे सरकार लवकरच पडेल असे म्हणतात. मात्र मी विरोधकांना सांगू इच्छितो की हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवाच. आम्ही काही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही,” असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्या शिवाय दाखवणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होत असते ते इतिहासात दाखले आहे” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणेंवर ही यावेळी निशाणा साधला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी केली. ते म्हणाले, “काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाची नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही” अशी टीका ठाकरे यांनी केली.

Leave a comment

0.0/5