Skip to content Skip to footer

मुंबई मनपा कर्मचारी दिवाळी बोनस प्रश्र्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी.

मुंबई मनपा कर्मचारी दिवाळी बोनस प्रश्र्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी.

मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस प्रश्न आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयापर्यंत पोहचलेला आहे. या संदर्भात उद्या सायंकाळी सहा वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मनपा कर्मचारी संघटना समन्वय समितीसोबत बैठक होणार आहे.
या बैठकीत जवळपास एक लाख महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस सानुग्रह अनुदाना बाबत चर्चा होणार आहे. कर्मचारी संघटना समन्वय समिती आणि पालिका आयुक्त चहल यांच्यात बैठक होवूनही निर्णय होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता बैठक होणार आहे.
मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह बोनस देण्यात आला होता. २ वर्षाआधी १४,५०० रुपये बोनस देण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यंदा अधिक बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. यंदा २० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रश्नावर व मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a comment

0.0/5