Skip to content Skip to footer

राज्यात कोरोना बधितांचा मृत्युदर कमी; ९१ मृत्यू झाल्याची नोंद.

राज्यात कोरोना बधितांचा मृत्युदर कमी; ९१ मृत्यू झाल्याची नोंद.

कोरोनाच्या महसंकटात संपूर्ण देश भयभीत झालेला असताना, आता काही प्रमाणात अनेक राज्यांमध्ये कोरोना बधितांची तसेच त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच महाराष्ट्रात वाढत्या कोरोना बधितांमुळे परिस्थिती चिंताजनक झालेली असताना आता रुग्ण वाढीचा आणि मृत्यूचा दर कमी झाल्याने दिलासा मिळत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा ८९.५३ टक्के तर मृत्युदर २.६३ टक्के आहे.

तसेच राज्यात सध्या १ लाख २९ हजार सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात ८,४३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत १४ लाख ८६ हजार रुग्ण कोरोनाची लढाई जिंकले असून, एकूण बधितांची संख्या १६ लाखांवर पोहचली आहे.

Leave a comment

0.0/5