कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी एसटी महामंडळ काढणार २००० कोटीचे कर्ज!
कोरोनामुळे एसटी महामंडळाची वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याकारणामुळे एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके सुद्धा पैसे तिजोरीत शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवलेले आहे.
त्यात दिवाळीच्या तोंडावर दिवाळी गोड करण्यासाठी एसटी महामंडळाने १००० हजार कोटीचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
कोरोनाकाळात एसटीला मिळणार २२ कोटींचे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे नाही तर तोटा वाढतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे उत्पन्नाची साधने वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाले आहे. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत.
त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी अशी शासनाचीही परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचं कर्ज काढण्यात येईल, असे परब म्हणाले आहेत