Skip to content Skip to footer

मराठा आरक्षणासाठी उमरगा ते मुंबईमधील प्रवेश करणाऱ्या मराठा तरुणांनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट.

मराठा आरक्षणासाठी उमरगा ते मुंबईमधील प्रवेश करणाऱ्या मराठा तरुणांनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट.

मराठा आरक्षणासाठी उमरगा ते मुंबई असा ५८० किमीचा प्रवास करून आलेल्या तरुणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्यांने लढा देत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाय प्रवास करून आलेल्या तरुणांना दिली.

तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत की, हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा ५८० कि.मी.चा प्रवास पायी केला.

उमरगा ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी त्यांना १३ दिवस लागले. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षां निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Leave a comment

0.0/5