राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यासाठी अडचण वाटत असेल- अब्दुल सत्तार
राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट घेतली होती. तसेच या दरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सविस्तर चर्चा सुद्धा केली. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न भेटता पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. यावरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष केले होते.
आता विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेने जशाच तसे उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले आहेत.