भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर ; युवा खेळाडू कॅमरून ग्रीनला संधी.

ads

भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर  ; युवा खेळाडू कॅमरून ग्रीनला संधी.

भारताविरुद्ध २७ नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी ट्वेंटी सामान्यांच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला असून, कॅमरून ग्रीन या नवोदित अष्टपैलू युवा खेळाडूचा संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी २७ नोव्हेंबर पासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका व त्यानंतर ४ ते ८ डिसेंबर मध्ये तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये ग्रीन याची दमदार कामगिरी बघता भारताविरुद्ध कडा मुकाबला करण्यासाठी ग्रीन तयार असल्याचे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि ट्वेंटी ट्वेण्टी सामन्यांसाठी संघ : अरोन फिंच ( कर्णधार ), सीन एबोट, एश्टोन एगर, अलेक्स कारे, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, मोझेस हेनरिकेस, मार्णस लाबुशेन, ग्लेन मॅकस्वेल, डनिएल सैमस्, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, मार्कस स्तोयनिस, मैथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर, अडम झाम्पा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here