बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता आणि आता…
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई होता. मात्र आता पुण्यात असल्याचे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखविले आहे. आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असेही त्यांनी बोलून दाखविले होते.
युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे नरेंद्र मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होत आहे, असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला.