मुंबई पोलीस योग्य तो निर्णय घेतील, परिवहन मंत्री अनिल परब यांचे वक्तव्य.
मुंबई, भेंडी बाजारमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. तसेच मॅक्रॉनचे फोटो रस्त्यावर टाकून पायदळी तुडवले गेले आहे. पैगंबरांचे व्यंग्यचित्र काढणाऱ्या
त्या मासिकाचे समर्थन केल्याबद्दल अनेकांच्या मनात मॅक्रॉन यांच्या विषयी संताप निर्माण होत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. रझा अकादमीच्या मौलाना अब्बास यांनी हे आंदोलन केले.
मोहम्मद पैगंबरांचा अपमान करणाऱ्याला हीच शिक्षा योग्य असल्याचे ते म्हणाले आहेत. तर फ्रान्स हा भारताचा मित्र असल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा असा अपमान करणाऱ्या रजा अकादमीवर राज्यात बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबत मुंबई पोलीस योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लीम देशांतून अनेक आंदोलन होत आहे. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. त्याविरोधात मुंबईतील काही भागांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील नागपाडा आणि भेंडीबाजार भागात मॅक्रान यांचे छायाचित्रे रस्त्यावर काढण्यात आले होते. त्यापैकी दोन पोस्टर सुरक्षित राहिले होते ते पोस्टर आज सकाळी मुंबई पोलिसांनी पाणी टाकून खरवडून काढून टाकले होते.