पालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केले ३ कोटी ४९ लाख रुपये.
कोविड – १९ पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरने मनपाने बंधनकारक केले होते. मात्र तरीही काही मुंबईकर कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात न घेता विना मास्क वावरताना दिसून येत आहे. आशा विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालून फिरणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.
त्यानुसार एक लाख ६० हजारांहून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडवसुलीतून आतापर्यंत तीन कोटी ४९ लाखांहून अधिक रक्कम मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तीला मास्क वापरने बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क वापर न करणाऱ्यांविरुद्ध ९ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला हा दंड १००० रुपये होता, तो आता २०० आकारण्यात आला आहे.
‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर संयुक्त कारवाई आराखडा सुद्धा तयार केला आहे. तसेच त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.