Skip to content Skip to footer

विधानपरिषदेसाठी पाठवलेली नावं बाजूला ठेवायचं ठरलंय – हसन मुश्रीफ

विधानपरिषदेसाठी पाठवलेली नावं बाजूला ठेवायचं ठरलंय – हसन मुश्रीफ

विधानपरिषदेची पाठवलेली नाव बाजूला ठेवायचं, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात ठरलंय असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असे वक्त्यव्य केल्याचं मुश्रीफ यांनी म्हंटल आहे.

 

राज्यपालांना राजकीय अभिनिदेश आहे. तसेच भाजपा नेते राज्यपालांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे, असे सुद्धा हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविले आहे. यावर बोलताना मुश्रीफ पत्रकार परिषदेत म्हणालेत की, मंत्री मंडळाच्या बैठकीत विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नावे ठरवून राज्यपालांकडे पाठवायची आहे.

 

यावर चंद्रकांत पाटील हे मनात काही न ठेवणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी आमदार विनय कोरे यांना सांगितले की, सावकार तुम्ही काही चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांमध्ये यावर चर्चा झालेली क्रमविकास आघाडीची येणारी १२ नाव बाजूला काढून ठेवायची हे आधीच ठरले आहे, असे पाटील यांनी पन्हाळा शाहूवाडीचें आमदार विनय कोरे यांना बोलताना म्हटले आहे.

 

Leave a comment

0.0/5