Skip to content Skip to footer

राज्य सरकार १५ विविध कंपन्यांशी करार करणार…

राज्य सरकार १५ विविध कंपन्यांशी करार करणार…

राज्य सरकार आज १५ विविध कंपन्यांशी करार करणार आहे. १५ एमओयुद्वारे ३५ हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. तसेच २४ हजार नवे रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरे सरकारमधील सर्वात मोठी गुंतवणूक आज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आज विविध कंपन्यांशी ३५ हजार कोटींचे एमओयुद्वारे नेटमॅजिक सोबत १० हजार कोटीचे करार होणार आहे. तर अदानी ग्रुप सोबत ५ हजार कोटींचा, निएससार इंडिया सोबत ४ हजार ५०० कोटींचा तर कोल्ड युके सोबत ४ हजार ५०० कोटींचा करार होणार आहे.

तसेच नवी मुंबई डेटा सेंटरमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यात येणार आहे. ऑईल आणि गॅस, इलेकट्रीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास देखील राज्य सरकारकडून दिला जात आहे.

Leave a comment

0.0/5