क्रिती सॅनन प्रभासासोबत करणार स्क्रीन शेअर.
‘बाहुबली’ च्या अविश्वसनीय यशानंतर प्रभास संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला. प्रभासचे नाव आता फक्त दाक्षिण्यात चित्रपट सृष्टी पुरते मर्यादित नसून, ते जगभर पोहचले आहे. अशातच ‘आदिपुरूष’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रभास अधिक चर्चेत येत आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात प्रभाससोबत कोणती अभिनेत्री झळकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच याबद्दल सोशल मीडियावर ही जोरदार चर्चा देखील सुरू होती. यात प्रभासासोबत अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी यांच्या नावाची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता सर्व चर्चांवर पडदा पडला असून, क्रिती सॅनन हीच नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.