दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफचा मॅचींग मास्क.

ads

दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफचा मॅचींग मास्क.

बॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या लूक आणि फॅशनमुळे चर्चेत असतात. कोरोनामुळे देशभर लागलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे क्वारंटाइन लूक्स शेयर केले होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर देखील काही सेलिब्रिटी त्यांचे लूक्स शेयर करत आहेत.

सध्या टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे चांगलेच चर्चेत आहेत. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी विविध प्रकारचे मास्क बाजारात आलेले आहेत. याच मास्कामुळे या दोघांची चर्चा मीडिया मध्ये होत आहे. सोबत लंच, डिनर व फिरण्यामुळे हे दोघे असेही चर्चेत असतात. परंतु बाहेर असताना दोघांनी मॅचींग मास्क वापरल्यामुळे आणि तसा फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा मिडियाचे लक्ष त्यांनी केंद्रित केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here