Skip to content Skip to footer

सरकारच्या बदनामीसाठी ट्विटरवर हॅशटॅग स्कॅम, मुंबई पोलिसांनी केले उघड.

सरकारच्या बदनामीसाठी ट्विटरवर हॅशटॅग स्कॅम, मुंबई पोलिसांनी केले उघड.

सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर ठाकरे सरकार, मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्या विरोधात बदमानीकारक पोस्ट पसरवण्यासाठी घडवण्यात आलेल्या हॅशटॅग स्कॅमचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. हा आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पसरवण्यासाठी परदेशातून ट्विटर अकाऊंट्स ऑपरेट करण्यात आले. त्यापैकी काही अकाऊंट्स ऑपरेट करण्यासाठी बॉट्सचाही वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचे भांडवल करून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीकारक पोस्ट पसरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या संशयास्पद ट्विटर अकाऊंट्सची संख्या १ लाख ५० हजारांहून अधिक असून, यापैकी काही अकाऊंट्स ऑपरेट करण्यासाठी १ हजाराहून अधिक बॉट्सचा वापर करण्यात आल्याचे सायबर अहवालातुन समोर आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनामी करता वापरलेले ट्विटर अकाऊंट्स भारताबाहेरून चीन, पनामा, हाँगकाँग, नेपाळसारख्या देशातून ऑपरेट करण्यात आले. यापैकी काही ट्विटर अकाऊंट्स यूजर्सची ओळख लपवण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करून ऑपरेट करण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह आणि बदमानीकारक पोस्टसाठी वापरण्यात आलेल्या ट्विटर अकाऊंट्वरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये #JusticeforSSR , #SSR , #ParamBirScam , #ParamBirSinghResign , #SanjayRaut , #OfficeofUT , #AUThackeray , #BabyPenguin अशा प्रकारचे तब्बल १९ हॅशटॅग आणि मेन्शन्स वापरण्यात आले, असे सायबर तपासात समोर आले आहे.

Leave a comment

0.0/5