आर रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी केली अटक!
आर रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे.
आज पनवेल पोलीस त्यांच्या मुंबईस्थित घरी पोहचले होते. यावेळी अर्णव गोस्वामी यांनी दीड तास पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यानंतर पोलिसांनाही अर्णब यांना अटक केली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
प्रकरण असे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत २६ मे २०२० रोजी सांगितले होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकने पैसे थकवल्यामुळे वडील आणि आजीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. असे बोलून दाखविले होते.