Skip to content Skip to footer

अल्प बुद्धी दिसतच आहे! ; आमदार यामिनी जाधव यांचा अमृता फडणवीसांना टोला.

अल्प बुद्धी दिसतच आहे! ; आमदार यामिनी जाधव यांचा अमृता फडणवीसांना टोला.

कांजूरमार्ग येथे मेट्रोची जागा ही केंद्र सरकारच्या मालिकीची आहे असा दावा केंद्राने केला होता. त्यामुळे मेट्रोच्या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. याच प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेनेला टोला लगावला होता.

आता मिसेस फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. “हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरे झाले असते. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी “अल्प बुद्धी” दिसतेच आहे, असे ट्विट करत आमदार यामिनी जाधव यांनी टीका केली आहे.

Leave a comment

0.0/5