आता करा वॉट्सअॅप वरून पैसे ट्रान्सफर…
भारतात सध्या सर्व व्यवहार रोखीने हातानं दिसून येत आहे. फोन मे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात इतर आर्थिक व्यवहारासाठी वापर होताना दिसून येत आहे. त्यात भारत रोखीच्या व्यवहारावर फार काळ अवलंबून राहिलेला नाही. त्यातच आता या अॅप्सना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्स अॅप मैदानात उतरणार आहे.
आता व्हॉट्स अॅपवरुन आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. नुकतीच व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी अहवाल सादर केला आहे.
व्हॉट्सॲपने जून महिन्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसेच काही व्हॉट्स ॲप युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होती. याद्वारे कंपनीने त्यांची पेमेंट सेवा गेल्या काही महिन्यात तपासून पाहिली. लवकरच ही सेवा सर्वांना मिळणार आहे. NPCI ने सध्या काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. लवकरच ही मर्यादा वाढवली जाणार आहे.