Skip to content Skip to footer

सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती सुपरस्टार चिरंजीवी यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. काही दिवसांपासून कोरोनाची चाचणी करून घेतली होती त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यांची तब्येत ठण-ठणीत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी करोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोणतीही करोनाची लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जे लोकं माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी करोना चाचणी करुन घ्या. मी माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहीन’ असे ट्विट चिरंजीवी यांनी केले आहे.

चिरंजीवी हे लवकरच ‘आचार्य’ या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. आता चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ‘आचार्य’ या चित्रपटात चिरंजीवी हे दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची घोषणा करताच उत्सुकता पाहायला मिळाली होती.

Leave a comment

0.0/5