Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांदिवलीत आमदार दिलीप लांडे यांच्या तर्फे दिपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, अशी घोषणा देत कोरोनाच्या संसर्गाशी लढा सुरू केला आहे. मात्र आता दिवाळी सण तोंडावर आलेला असताना अनेक कुटुंब मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यांना दिलासा मिळावा आणि त्यांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी शिवसेना पक्ष सरसावला आहे.

त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेऊन चांदिवलीत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या तर्फे गरीब व गरजू नागरिकांना दिलासा देण्यासाठी दीपावली निमित्त दिवाळी भेट म्हणून स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी सरिता इस्टेट, उमा हॉटेल शेजारी, ९० फूट रोड आणि शिवाजी विद्यालय काजूपाडा, कुर्ला(प.), राजे शिवाजीनगर, पवई येथे नागरिकांना स्वस्त दरात साखर, रवा, मैदा, डालडा तूप या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच कोरोनापासून नागरिकांचे सरंक्षण व्हावे यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वाटप करण्यात आले. मंगळवारी शिवसाई मित्र मंडळ, धोबीघाट, परेरावाडी, साकीनाका येथे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाला साकीनाका, पवई , कुर्ला, चांदीवली इत्यादी विभागात आज सुरुवात करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणत नागरिक उपस्थित होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्याची जबाबदारी घेत आहेत. त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या विभागाची जबाबदारी घेत हा उपक्रम करीत असल्याचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.

यावेळी आमदार दिलीप लांडे यांच्यासह उपविभाग प्रमुख भास्कर पाटील, डॉक्टर अण्णामलाई, नगरसेविका चित्रा सांगळे, उपविभाग संघटिका मनीषा नलावडे, प्रमिला चव्हाण, शाखाप्रमुख नितीन गोखले, शैलेश निंबाळकर, लक्ष्मीकांत गवंडे, सचिन मदने, शाखा संघटिका श्वेता मसुरकर,पार्वती दारकुंडे, विद्या रेडकर, विधानसभा युवती अध्यक्षा प्रिया सूर्यवंशी तसेच राजेश्री देसाई, प्रणव लांडे, रामप्रसिद्ध दुबे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5