वाढीव वीज बिलात २ टक्यांची सूट, मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी

 

राज्यात लॉकडाऊन दरम्यान आलेल्या भरमसाठ बिलामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले होते. त्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला होता. त्यातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी बेस्टने दिलेली आहे. वीज ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेस्टने ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना लाखोंची वीजबिले आली होती. त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी, वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि उर्वरित थकबाकी वसुलीसाठी बेस्टने वीज ग्राहकांना बिलात दोन टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वीजग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीजबिल तात्काळ भरले, त्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here