Skip to content Skip to footer

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदासह संचालक मंडळ ठाकरे सरकारने बरखास्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मंडळाच्या सर्व नेमणूका रद्द करण्यात आल्या आहे. ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा मराठा समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं.

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आतापर्यंत ११ हजार मराठा तरुणांना साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. पण आता अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a comment

0.0/5