Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना कारागृहात भेटण्याची परवानगी नाही?

अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना कारागृहात भेटण्याची परवानगी नाही?

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिकनचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. अर्णब यांच्या अटकेवरून विरोधक आणि महाविकास आघाडी असे राजकारण रंगले असतानाच त्यात उडी घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात भेट घेऊ द्या, अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यावर देशमुखांनी हे स्पष्टीकरण देत राज्यपालांनाच जोरदार झटका दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या अटकेविरोधात भाजप आमदार राम कदम यांनी आंदोलन केले होते. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात त्यांची भेट घेण्याची आणि बोलण्याची परवानगी द्या, अशी सूचना केली होती. त्यावर अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन भेटण्याची परवानगी द्यावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोन केला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून सर्व तुरुंगात कैद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मनाई आहे. संसर्गाचा धोका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन भेटता येणार नाही.

Leave a comment

0.0/5