आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांचे पालकतत्व मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले!
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामधील होकर्णा गावातील रहिवासी कु. रेणुका गुंडरे इयत्ता दहावीत ९३.२०% मिळवून उत्तीर्ण झाली. पण या यशात एक दुःखाची झालर असल्याचे शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे साहेब यांचा निदर्शनास आले. त्यांनी त्वरित माहिती घेतली तेव्हा कळाले की, कु. रेणुका गुंडरे हिचा माता-पित्यांचे कृपाछत्र हरविल्याने लहान वयातच कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलणे खरोखर शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. ही गंभीरबाब एकनाथ शिंदे यांना जाणवली.
रेणुका सारख्या हुशार विद्यार्थिनीला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये आणि दोन धाकट्या भावंडाची जवाबदारी पेलता यावी यासाठी त्यांनी रेणुका आणि तिच्या भावंडाचे पालकतत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतली आहे. यासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय भाऊराव मोरे, लातूर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख या नात्याने आज कु.रेणुका गुंडरे हिचा निवासस्थानी जाऊन प्राथमिकस्वरुपी ₹ १,००,००० आर्थिक मदत राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सोबत उदगीर-जळकोट विधानसभा संपर्कप्रमुख ऍड. श्रीनिवास क्षिरसागर, जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, सिनेट सदस्य, युवासेना जिल्हा विस्तारक प्रा. सूरज डांबरे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आढवळे, बालाजी रेड्डी, गोपाळ माने नगरसेवक चाकूर, युवासेना जिल्हाविस्तारक कुलदीप, उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, जळकोट तालुकाप्रमुख संग्राम टाले , माजी सभापती ब्राहमजी केंद्रे , युवासेना उपजिल्हा विस्तारक रमण माने, अमर बुरबुरे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि त्याचे सहकारी प्रसाद सुर्यराव उपस्थित होते