मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल!
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.
‘तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल’, असे ट्वीट मंत्री धनजंय मुंडे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची सुद्धा लागण झाली होती त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते.