Skip to content Skip to footer

एसटी महामंडळाला १ हजार कोटीचे पॅकेज, परब यांची घोषणा!

एसटी महामंडळाला १ हजार कोटीचे पॅकेज, परब यांची घोषणा!

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या तिनही महिन्यांचा पगार दिवाळीपूर्वी एकत्र देण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले आहे. त्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होणार आहे.

याबाबत बोलताना परब म्हणाले की, “एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होता. महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणे कठीण होतं होते. गेल्या दोन-चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु होते. एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्याचं वेतन थकित होतं. त्यापैकी दिवाळीसाठी एका महिन्याचा पगार काल दिला. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नेहमी तयार होतो, म्हणून मी आज अजित पवारांकडे सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केली. त्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तिनही महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देणार आहोत. याबाबतची फाईल आज पुढे पाठवली असून, कर्मचाऱ्यांना दोन दिवसात पगार मिळेल. अशी घोषणा परब यांनी केली.

Leave a comment

0.0/5