Skip to content Skip to footer

मॉल व मोठ्या दुकानांसाठी मुंबई मनपाच्या नव्या गाईडलाईन

मॉल व मोठ्या दुकानांसाठी मुंबई मनपाच्या नव्या गाईडलाईन

दिवाळी खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सुरक्षित अंतर हाच एक पर्याय आहे. गर्दीवर नियंत्रण राहण्यासाठी मोठे मॉल आणि दुकानात ग्राहकांच्या प्रवेशासाठी एक आत येण्याचा मार्ग आणि एक बाहेर जाण्याचा मार्ग ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहे.

दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे. दरवर्षी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन मुंबई मनपाने नागरिकांना केले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने व मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे मॉल, दुकाने या ठिकाणी ये-जा करण्याचे दोन वेगळे मार्ग ठेवावे तसेच सोशल डिस्टंसिंग आणि इतर खबरदारी घेण्याचे आदेश दुकान व मॉल चालकांना दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5