Skip to content Skip to footer

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू! – अजित पवार

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्ताने राज्यभरातून तसेच देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, ‘स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी जनतेच्या मनावर कायम अधिराज्य केले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला’.

‘महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया’, असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5