बाळासाहेबांच्या स्मुर्तीदिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीस्थळावर न जमण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन!!, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here