दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर व्ह्यूईंग गॅलरीची मुंबई मनपातर्फे करण्यात येणार उभारणी

 

दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे समुद्र किनाऱ्यावर व्ह्यूईंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना समुद्र किनारा, वांद्रे-वरळी सी-लिंक सोबत सेल्फीचा आनंद लुटता येणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना या गॅलरीचा वापर करता यावा, यानुसार याचे बांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे समुद्राला लागूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. या चैत्यभूमीला लागूनच समुद्रात बांधकाम करून व्ह्यूईंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे याठिकाणी भेट देणाऱ्या लाखो लोकांना समुद्र किनारा, सी-लिंकसोबत सेल्फी काढता येणार आहे तसेच यातून पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

या व्ह्यूईंग गॅलरीचे बांधकाम हे सीआरझेड १ च्या अंतर्गत येते. त्यामुळे पालिका प्रशासनाला या बांधकामसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या गॅलरीचे काम करताना पायलिंग आणि आरसीसीचे काम असणार आहे. या गॅलरीच्या तीन बाजूला सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनलोखंडी जाळ्या देखील लावण्यात येणार आहे.

तसेच गॅलरीवरुन कोणीही घसरून पडू नयेत यासाठी पेव्हर ब्लॉक लावले जाणार आहेत. विशेष म्हणजे या गॅलरीचा सर्व वयातील लोकांना सहज वापर करता यावा याप्रमाणे त्याची रचना केली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here