पत्रीपुल एका महिन्यात सुरु करू! ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

ads

 

अनेक अडचणींवर मात करत अखेर पत्रीपुलाचे काम अंतिम टप्यात पोहचले आहे. त्यात येत्या महिन्याभरात या पुलाचे काम पूर्ण करून सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज या पुलाची पाहणी करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा भेट देणार आहे, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली होती.

पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे प्रत्यक्ष कार्यस्थळी गेले होते. पत्रीपुलावर ७६ मीटर लांबीचा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यरेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी सकाळी ९.५० पासून दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत डोंबिवली ते कल्याणदरम्यानची लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here