शिवभोजन देखील मोफत देण्यासाठी आमदार अंबादास दानवेंचे प्रयत्न

ads

 

विधानपरिषद आमदार आणि औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी लॉक डाऊन असो किंवा अनलॉकिंग दोन्ही काळात गरजूंना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यात ठाकरे सरकारच्या प्रमुख योजनेतील शिवभोजन योजना अनेक जिल्ह्यांमध्ये अविरत सुरू आहे.

गोरगरीब व गरजूंना अगदी कमी शुल्कात जेवण उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविली जात आहे. परंतु आमदार अंबादास दानवे यांनी ते शुल्क देखील स्वतः देऊन मोफत शिवभोजन उपलब्ध करून दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील अभिनव टॉकिज समोर गोरगरीब जनतेसाठी आमदार दानवे यांच्या मार्फत मोफत शिवभोजन केंद्र अविरतपणे सुरू आहे. या शिवभोजन केंद्रामार्फत लॉकडाऊनच्या संकटसमयी गोरगरीबांसाठी सुरवातीपासूनच अखंडपणे गरजूंना “मोफत शिवभोजन” दिले जात आहे. हे केंद्र रवी लोढा यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे चालवत जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here