भाजपने चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट केले – जयसिंगराव गायकवाड

भाजपात कामाची कदर केली जात नाही आणि कौतुक होत नाही. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केले आहे अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली. गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

जिथे कोंडमारा होतो, त्या पक्षात रहायचं नाही असं मी ठरवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोकळा श्वास घेतला असे गायकवाड यांनी बोलून दाखविले. पुढे बोलताना मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी पक्ष देईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, असेही जयसिंगराव गायकवाड म्हणाले.

पुढे जयसिंगराव गायकवाड यांचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, गेली ३० वर्षे मी जयसिंगरावांना पाहतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा, हे त्यांच्याकडे पाहून कळते. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही तर मतदारसंघात फिरत राहिला असे कौतुक शरद पवार यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here