अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. या संदर्भातील माहिती त्यांच्या मुलाने ट्विट करून दिलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती.

अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

अहमद पटेल यांच्या जाण्याने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here