Skip to content Skip to footer

जळगावातील आणखी एक भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

जळगावातील आणखी एक भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

काही दिवसांपूर्वी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर जळगाव मधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ जळगाव मधील आणखी एक भाजपा आमदार राष्ट्र्वादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहे.

भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात. पण, यंदा जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. मात्र त्या जागी एकनाथ खडसे यांचा फोटो असल्यामुळे राजकीय वर्तुळात सावकारे यांच्या त्या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु झालेली आहे.

त्यातच भाजपा फोडण्यासाठी एकनाथ खडसेंपासून सुरुवात केली असून अनेक भाजपा आमदार राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे विधान मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले होते. आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चेला जळगावात उधाण आले आहे.

Leave a comment

0.0/5