Skip to content Skip to footer

बाबा नेमकी तुमची भूक किती? राजू शेट्टी यांचा थेट अंबानीना सवाल

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्या विरोधात मागच्या २१ दिवसांपासून शेतकरी दिल्ली येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. त्यात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करून केंद्र सरकारला आवाहन दिले आहे.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे येथे पत्रकार परिषद आयोजित करून केंद्रावर घणाघाती टीका केली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. अशी माहिती शेट्टी यांनी दिली. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून जवळपास तीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.

तसेच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्या दोघांमधील अंबानी हे जगात पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत येत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की, बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे. हे एकदाचे सांगून तरी टाक हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातुन विचारणार आहोत.

Leave a comment

0.0/5