Skip to content Skip to footer

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे

कोकणातील पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिलेली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करित आहेत. यापुढील काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने व्यापक कार्य केले जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कोकणातील पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी विविध उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. असे ही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5