सरनाईक यांनी बांधलेल्या विहंग गार्डन येथील बी १ आणि बी २ या इमारतींना अद्याप परवाना मिळाला नाही. तसेच इमारतीचे ९ ते १३ मजले अनाधिकुत असल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला होता. या संदर्भात सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. यावर खुद्द आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले होते.
मात्र आता सरनाईक यांनीही सोमय्यांनी लागावलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. सोमय्या यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या विरोधात १०० कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे असे सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले होते.
विहंग गर्धन ही इमारत कोणत्याही प्रकारे अनाधिकृत नाहीये. ही इमारत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे माझी खोटी बदनामी केल्या प्रकरणी सोमय्या यांच्या विरोधात मी कोर्टात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’ असे सरनाईक यांनी नोटीसाद्वारे स्पष्ठ केले आहे.