मुंबई महानगर पालिका मुख्यालय ही ऐतिहासिक वास्तू आता पर्यटकांना पाहता येणार

Mumbai-Municipal Corporation-Employees-

मुंबई महानगर पालिका मुख्यलयातील ऐतिहासिक वास्तू आता पर्यटकांना पाहता येणार आहे. नवीन वर्षावर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी पर्यटकांना मुंबई मनपा कार्यालयात हेरिटेज वॉक करता येणार आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि महानगर पालिकेमध्ये करार करण्यात आलेला आहे.

यानिमित्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेत येऊन इमारतीचा आढावा घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर याही यावेळी उपस्थित होत्या. महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. मुंबई मनपा आणि एमटीडीसी यांच्यात याबाबत करार झाला आहे.

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. महापालिकेची ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. या वास्तूचं अंतर्बाह्य सौंदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

मुंबई महापालिकेची आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख आहे. महापालिकेची ही वास्तू ब्रिटिश काळात बांधली गेली होती. या वास्तूला १२५ हून अधिक वर्ष झाले आहेत. १८८९ ला याच्या बांधकामाला सुरुवात झाली. १८९३ मध्ये अवघ्या चार वर्षात ही ऐतिहासिक वास्तू तयार झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here